Monday, June 20, 2011

सहवास

हात तुझा माझ्या हातात, श्वास तुझे माझ्या श्वासात,
मनं केव्हाच जुळली होती, आज शरीराचाही सहवास...

तुझ्या मिठीची ऊब अशी, रोमांच अंगावर उभे करी,
स्वप्नात असल्या सारखं वाटलं, ओढलंस जेव्हा बाहुपाशात...
मनं केव्हाच जुळली होती, आज शरीराचाही सहवास...

तुझ्या अंगाचा मादक गंध, वेडावणारा गव्हाळ रंग,
चव जिभेची बदलून गेली, घडलं जेव्हा ओठांचं रसपान...
मनं केव्हाच जुळली होती, आज शरीराचाही सहवास...

मऊ-मुलायम शरीर तुझं, डोंगर-दर्‍यांनी भरलेलं,
हात अपुरे पडू लागता, तोंडाचंही मग सुटलं भान...
मनं केव्हाच जुळली होती, आज शरीराचाही सहवास...

भिडवलं जेव्हा अंग-अंग सारं, एकमेकांत घुसली शरीरं,
आतमधून हुंकार उमटला, प्रेमरसाला आलं उधाण...
मनं केव्हाच जुळली होती, आज शरीराचाही सहवास...

No comments:

Post a Comment