Friday, July 22, 2011

प्रवास

हे प्रेम असे की ध्यास शरीर-सुखाचा?
न उमजे का मज हव्यास तुझ्या स्पर्शाचा...
ती हसते, म्हणते 'नको करुस द्वेष स्वतःचा,
शरीराच्या मार्गे चाले हा प्रवास मनोमनीचा.'