Sunday, December 30, 2012

प्रश्न


रस्त्याच्या कडेला मोठी सभा चालू होती. रस्त्यानं येणारे-जाणारे थांबून बघत होते. मक्या सायकलवरून चालला होता. गर्दी बघून थांबला. सायकल कडेला घेतली आणि टाचा वर करून बघू लागला. एक बाई जोरजोरात काहीतरी बोलत होत्या. भोवती जमा झालेल्या लोकांमध्ये पण बायकाच जास्त होत्या. बोलणार्‍या बाई कुणाकुणाची नावं घेत होत्या - "झाशीची राणी, जिजामाता, इंदीरा गांधी, कल्पना चावला... किती उदाहरणं देऊ? माझ्या माता-भगिनींनो तुम्ही सांगा, आज एक बाई स्वतःच्या पायावर उभी राहीली तर काय करू शकणार नाही?"

मक्यानं आवाज दिला, "बाई, मी सांगू?"

सगळ्यांच्या नजरा मक्याकडं वळल्या. बोलणार्‍या बाई कपाळावर आठ्या आणत म्हणाल्या, "सांगा... काय करू शकणार नाही बाई उभी राहीली तर?"

मक्या इकडंतिकडं बघत म्हणाला, "लघवी!"